हवाई दलाचे प्रमुख म्हणून सरकारने एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती केली आहे. सध्या एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लवकरच ते उपप्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन हवाई दलाचे प्रमुख म्हणून धुरा सांभाळतील.
एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे ३० सप्टेंबर २०२४ पासून एअर चीफ मार्शल या पदाची सूत्रे हाती घेतील. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे त्याच दिवशी निवृत्त होणार असून अमर प्रीत सिंग हे त्यांचे पदाचा कार्यभार स्वीकारतील. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय हवाई दलाचे ४७ वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय हवाई दलातील त्यांचा प्रवास १९८४ साली सुरू झाला. सिंग यांना २१ डिसेंबर १९८४ रोजी इंडियन एअर फोर्सच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले. प्रतिष्ठित सेंट्रल एअर कमांडची (CAC) कमान घेण्यापूर्वी त्यांनी इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले.
हे ही वाचा..
तिरुपती लाडू प्रकरण ; पुरवठादार काळ्या यादीत
टीडीपी नेते गांडी बाबाजींचा वायएसआर काँग्रेसवर हल्लाबोल
तिरुपती लाडू प्रकरण; जगनमोहन यांचेच हे षडयंत्र!
धारावीत तणाव; मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, गाड्या फोडल्या
नॅशनल डिफेन्स अकादमी, वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी, सिंग यांनी मिग- २७ स्क्वॉड्रनचे फ्लाइट कमांडर आणि कमांडिंग ऑफिसर, तसेच एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग यासह महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांना २०१९ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि २०२३ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक देण्यात आले आहे.