एअर इंडियाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नवी कोरी विमाने

१८ महिन्यांसाठी दर सहा दिवसांनी एक नवीन विमान एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार

एअर इंडियाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नवी कोरी विमाने

टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी एअर इंडियाच्या ताफ्यात लवकरच नव्या विमानांची भर पडणार आहे. एअर इंडियाने ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे त्यानुसार पुढील १८ महिन्यांसाठी दर सहा दिवसांनी एक नवीन विमान एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

विल्सन यांनी सांगितले की, एअर इंडिया कंपनीने एकूण ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियाची नवीन विमाने तैनात केली जात आहेत. तसेच अनेक नवीन क्रू आणि कर्मचाऱ्यांची भरती करत असून कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे.

एअर इंडियाने एकूण ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे आणि पुढील १८ महिन्यांत दर सहा दिवसांनी एअर इंडियाच्या ताफ्यात एक नवीन विमान सामील होणार आहे. नवीन विमाने असणार आहेत. अनेक नवीन क्रू आणि कर्मचारी भरती करत असून कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण पद्धतीत सुधारणा करत आहोत आणि अजून काम करायचे आहे, अशी माहिती सीईओ यांनी दिली. एअर इंडियाच्या बहुसंख्य ग्राहकांना विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा हवा आहे आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हे आव्हान असणार आहे असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

अवघ्या २४व्या वर्षी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू झाला निवृत्त

सूरत रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून दुसरे समन्स

नवीन विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तैनात करण्यात येत असून एअर इंडिया कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेला आठ टक्के वाढीव वार्षिक वाढ दराने (CAGR) सेवा देण्यासाठी ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. विल्सन यांनी इतर विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा आणि एअर इंडियासाठी वाहतूक वाढविण्याचा विश्वासही व्यक्त केला.

Exit mobile version