32 C
Mumbai
Saturday, May 10, 2025
घरविशेषपहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून जादा उड्डाणं; आणखीही सेवा उपलब्ध

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून जादा उड्डाणं; आणखीही सेवा उपलब्ध

जम्मू- काश्मीरमधील पर्यटकांना दिलासा

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात २७ जणांनी आपला प्राण गमावला. देशासह जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. सुरक्षा दलांकडून या परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

सुट्टीचा हंगाम असल्याने जम्मू- काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक पोहचले आहेत. पहलगाममध्येही हल्ल्याच्या वेळी मोठ्या संख्येने लोक सुट्टीचा आनंद लुटत होते. याचंवेळी अचानक हा हल्ला झाला. सध्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून जम्मू- काश्मीरमधून माघारी परतण्यासाठी पर्यटकांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.

टाटा समूहाच्या एअर इंडिया या विमान कंपनीने मोठा निर्णय घेत बुधवारी दोन जादा विमानं श्रीनगरहून उड्डाण करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ३० एप्रिल पर्यंत श्रीनगरसाठी ये- जा करणाऱ्या विमानांची वेळ बदलणं आणि तिकिट रद्द केल्यास पूर्ण रिफंड या दोन सेवा सुरु केल्या आहेत. यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पहलगाममध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याने काश्मीरमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. रामबन जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. यामुळेही टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सकडून अडकलेल्या पर्यटकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर टाटांच्या एअर इंडिया या विमान कंपनीने ३० एप्रिल पर्यंत रिफंड आणि कॅन्सलेशनच्या सेवा मोफत दिल्या आहेत.

बुधवार, २३ एप्रिल रोजी श्रीनगहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांची उड्डाणं होणार आहेत. श्रीनगरहून दिल्लीसाठी सकाळी ११.३० वाजता विमान उड्डाण करणार आहे. तर श्रीनगर ते मुंबई हे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करणार आहे. या विमानाच्या तिकिटांचं बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. श्रीनगरहून जाणारी इतर विमाने वेळापत्रकाप्रमाणे असतील असंही एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा : 

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा हातात बंदूक धरलेला फोटो आला समोर

जम्मू-काश्मीर: दहशतवादी म्हणाला, ‘जा आणि मोदींना सांगा’

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा चिमटा

हिंदू पर्यटकांना निवडून पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या, २७ मृत्यू

तसेच एअर इंडियाने श्रीनगरसाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कन्फर्म बुकिंग असलेल्या प्रवाशांना कॅन्सलेशन आणि रिशेड्यूलिंग या दोन सेवा मोफत पुरवल्या आहेत. तिकिट रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसची विमानं श्रीनगरहून बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणांसाठी थेट फ्लाईट आहेत. तसंच एअर इंडिया कंपनीची विमानं दिल्ली आणि मुंबई या ठिकाणीही विमानसेवा पुरवते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
247,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा