DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!

एअर इंडियाच्या सुरक्षेतील त्रुटी निदर्शनास आल्याने कंपनीवर कारवाई

DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!

एअर इंडियाच्या विमानांमधील सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा दंड ठोठावला आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डीजीसीएने एअरलाइनला १.१० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइन कर्मचाऱ्याकडून एअर इंडिया कंपनीवर आरोप करण्यात आला होता. एअर इंडियाची जी लांब पल्ल्याची विमाने आहेत त्या विमानात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही,असा आरोप करण्यात आला होता. याबाबत डीजीसीएने आज एक पत्र जारी करत एअर इंडियाला दंड ठोठावला आहे.

हे ही वाचा:

‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!

कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करून जदयू, राजद पक्षांच्या मुद्द्यातील हवा काढली

मागासवर्गीयांसाठी लढणारे, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न

‘राम मंदिर उद्घाटन माझ्यासाठी अध्यात्मिकता; राजकारण नव्हे’

डीजीसीएच्या निवेदनानुसार, एअर इंडियाची विमाने दीर्घ काळासाठी उड्डाणे करताना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतात असा आरोप कंपनीवर करण्यात आला होता.या आरोपावरून एअर इंडियाविरोधात तपशीलवार तपासणी करण्यात आली.डीजीसीएने म्हटले आहे की, तपासात प्रथमदर्शनी एअरलाइनने पालन न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डीजीसीएने एअर इंडियाला १.१० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विमानतळाच्या धावपट्टीवरच प्रवासी जेवायला बसले होते.या प्रकरणी इंडिगो या कंपनीला आणि मुंबई विमानतळ संचालक मंडळ यांना १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.यापैकी इंडिगो कंपनीला १ कोटी २० लाख तर मुंबई विमानतळ संचालक मंडळाला ६० लाख रुपये इतका दंड भरावा लागला.

Exit mobile version