एअर इंडिया रतन टाटा समूहाच्या पंखाखाली आल्यापासून दिवसेंदिवस ही कंपनी कात टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. आता एअर इंडियाचा कायापालट करण्याची प्रक्रिया सुरू सुरू झाली असून लवकरच एअर इंडिया एक हजार वैमानिकांची भरती करणार आहे. जागतिक पायलट दिनानिमित्त टाटा समूहाची कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात ही भरती मोहीम सुरू करणार आहे.
एअर इंडिया वैमानिक व वरिष्ठ वैमानिकांसह प्रशिक्षणार्थी वैमानिकांचीही भरती करणार आहे. एअर इंडिया टाटा समूहाकडे गेल्यापासून मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येत आहे. यासाठी नवीन विमानांची ऑर्डरही देण्यात आलेली आहे. त्यामुळे एअर इंडियात मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती होणार आहे.
एअर इंडियाच्या ताफ्यात बोइंग आणि एअरबस अशा ५०० हून अधिक विमानांच्या खरेदीसाठी ऑर्डर दिलेली आहे. ए ३२०, बी ७७७, बी ७८७ व बी ७३७ या विमानांचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश होणार आहे. यात मोठ्या आकारांच्या विमानांचाही समावेश आहे. एअर इंडियाकडे सध्या १,८०० पायलट आहेत. त्यामुळे एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची भरती होणार आहे. यामुळे वैमानिक, प्रशिक्षणार्थी वैमानिकांना या पदांसाठी अफाट संधी उपलब्ध झालेली आहे.
हेही वाचा :
शारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट
अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू
जनता दलाचे नेते कैलाश महतो यांची गोळी झाडून हत्या
जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
भारतीय नागरिकांसह परदेशात राहणारे भारतीय एअर इंडियात अर्ज करण्यास परवानही आहे. मात्र, टाटा समूहाच्या दुसऱ्या विमान कंपन्यांचे वैमानिक एअर इंडियात अर्ज करू शकणार नाहीत. निवड होण्यासाठी प्रशिक्षणार्थी वैमानिक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. याशिवाय, सायकोमेट्रिक चाचणी, वैयक्तिक मुलाखत, सिम्युलेटर फ्लाइट प्रवीणता चाचणी, प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट, अर्जदारांसाठी पार्श्वभूमी पडताळणी चाचणी देखील असेल. अर्जदार कोणत्याही माहितीसाठी aigrouphiring@airindia.com या ई-मेलवर मेल करू शकतात.