28 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेष‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष

‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष

‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांवर एअर इंडिया आणि इंडिगो हवाई वाहतूक कंपन्यांचे भाडेतत्त्वावर घेण्यासंबंधी लक्ष

Google News Follow

Related

दिवाळखोरीत गेलेल्या ‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया आणि इंडिगो हवाई वाहतूक कंपन्यांचे लक्ष लागले असून ही विमाने कंपनीला भाडेतत्त्वावर देणाऱ्यांशी त्यांनी संवादही सुरू केल्याचे समजते. गो फर्स्टकडे केवळ एअरबस ए३२० आहेत, ज्या या दोन हवाई कंपन्याही वापरतात.

गेल्या आठवड्यात, ‘गो फर्स्ट’ एअरलाइन्सच्या ७४० वैमानिकांपैकी बहुतेक वैमानिक इंडिगो आणि एअर इंडियामध्ये आणि परदेशी विमान कंपनी अकासा येथे दाखल झाले आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांना ‘ऑफर लेटर’ देण्यात आली आहेत. ‘गो फर्स्ट’ कंपनीने मात्र या वैमानिकांनी डीजीसीएच्या नियमानुसार, नोटीस कालावधी पूर्ण करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे त्यांना कंपनी सोडणे कठीण झाले आहे. आतापर्यंत, ४५ ‘गो फर्स्ट’ कंपनीला विमाने भाडेतत्त्वावर देणाऱ्यांनी त्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी डि-रजिस्ट्रेशन अँड एक्स्पोर्ट रिक्वेस्ट ऑथोरायझेशन (आयडीईआरए) अंतर्गत अर्ज केला आहे. ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीच्या याचिकेवर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) बुधवारी आपला निर्णय देईल.

मंगळवारी न्यायाधिकरणाच्या वेबसाइटवरील नोटीसनुसार, ‘गो फर्स्ट’ने या संदर्भातील लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यांची याचिका लवकर मान्य झाल्यास, त्यांना पैसे देणाऱ्या भागधारकांकडून होणाऱ्या कारवाईपासून संरक्षण मिळेल. त्यानंतर भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपन्या त्यांची विमाने पुन्हा ताब्यात घेऊ शकणार नाहीत. विमान वाहतूक नियामकांना आयडीईआरएच्या विनंतीवर पाच कामकाजाच्या दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. या तरतुदीनुसार २३ विमाने ताब्यात घेण्यासाठी पहिला अर्ज ४ मे रोजी दाखल करण्यात आला आणि त्यानंतर १३ आणि नऊ विमानांसाठी आणखी दोन अर्ज करण्यात आले.

हे ही वाचा:

“महाराष्ट्रात दंगल घडवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार”

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!

ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

‘गो फर्स्ट’च्या ताफ्यातील विमाने एअर इंडियामध्ये समाविष्ट करण्याची योजना आहे की नाही, यावर एअर इंडियाने कोणतेही भाष्य केले नाही. तर, इंडिगोने ‘अनुमानांवर भाष्य करणे हे आमचे धोरण नाही’, असे स्पष्ट केले. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींचा इंडिगोवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट करण्यास विलंब झाला आहे. अशा परिस्थितीत ‘गो फर्स्ट’ची विमाने त्यांना लाभदायक ठरू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा