एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब? धमकीनंतर प्रवाशांना उतरवले !

तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन स्थिती

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब? धमकीनंतर प्रवाशांना उतरवले !

मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर लगेचच तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. सकाळी आठच्या सुमारास एअर इंडियाचे विमान तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरल्यानंतर विमानाला आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मुंबई-तिरुवनंतपुरम एअर इंडियाच्या विमानात १३५ प्रवासी आणि क्रू मेंबर होते. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या ६५७ (BOM-TRV) या विमानाला २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. यानंतर सकाळी ८ च्या सुमारास विमान सुरक्षितपणे उतरले त्यानंतर ते तात्काळ आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, विमानतळाचे कामकाज सध्या अखंडित आहे.

हे ही वाचा :

“गर्व आहे की संपूर्ण जग भारताचा विश्वबंधु म्हणून आदर करतंय”

बदलापूर अत्याचार प्रकरण: संतप्त ग्रामस्थांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

आंध्र प्रदेशमधील फार्मा कंपनीत स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत

भांडणातून पुत्राने पित्याच्या वाहनाला कार ठोकली; चार जण जखमी

विमान तिरुअनंतपुरम विमानतळाजवळ येताच पायलटने बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती दिली. पायलटने सांगितले की विमानात १३५ प्रवासी होते. दरम्यान, बॉम्बची धमकी कोणी आणि कशी दिली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाची सध्या तपासणी सुरु आहे.

Exit mobile version