23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषएअर इंडियाच्या केबिन क्रूसाठी नवा गणवेश जाहीर

एअर इंडियाच्या केबिन क्रूसाठी नवा गणवेश जाहीर

Google News Follow

Related

एअर इंडियाने आपल्या केबिन क्रू आणि वैमानिकांसाठी नवा गणवेश मंगळवार १२ डिसेंबर रोजी सर्वांसमोर प्रदर्शित केला. हा गणवेश सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केला आहे. विमानातील महिला केबिन क्रू आधुनिक स्पर्श लाभलेल्या साड्या नेसतील. तर, पुरुष बंद गळ्याचे सूट घालतील. कॉकपिटमधील कर्मचारी क्लासिक काळ्या रंगाचा सूट परिधान करतील.

एअर इंडियाची पहिली एअरबस ए३५० सेवेत दाखल होत असतानाच, टप्प्याटप्प्याने हे नवे गणवेश सादर केले जातील. केबिन क्रूचे महिला कर्मचारी ब्लाऊज, ब्लेझर आणि ‘झरोका’ पॅटर्नमधील साडी नेसतील आणि त्यावर व्हिस्टा (एअर इंडिया लोगोचा आयकॉन) लावतील. एकप्रकारचे नीओ-ट्रेडिशनल प्रकारचा हा गणवेश असेल. रेडी टू वेअर साड्या पँटसोबत परिधान करण्याचाही पर्याय असेल.

महिला केबिन क्रूसाठी अधिकाधिक लवचिकता प्रदान करण्याच्या हेतूने त्यांना जे सोयीचे आहे, तसे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी पूर्व आणि पाश्चिमात्य शैलीचा संगम साधण्यात आला आहे. ज्येष्ठ महिला केबिन क्रूसाठी लाल व वांगी रंगाच्या छटा असलेल्या साड्या आणि ब्लेझरसह असतील. तर, कनिष्ठ महिला केबिन क्रू लाल ब्लेझरसह लाल ते जांभळ्या छटांच्या साड्या परिधान करतील, असे एअरलाइनने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तर, कॉकपिटमधील कर्मचारी काळ्या रंगाचा सूट परिधान करतील.

हे ही वाचा:

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड

काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल

शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!

भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!

भारताची विविधतेने नटलेली संस्कृती आणि पंरपरांचा मिलाफ साधतानाच आधुनिकतेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न हा गणवेश साकारताना करण्यात आल्याचे मनीष मल्होत्रा यांनी सांगितले. या गणवेशाला साजेशी पादत्राणेही मनीष मल्होत्रा यांनी साकारली आहेत. महिलांना काळी आणि बरगंडी रंगाच्या छटांची पादत्राणे असतील. तर, पुरुष काळ्या रंगाची पादत्राणे घालतील. महिला कर्मचारी मोत्यांचे दागिने आणि साजेशा स्लिंग बॅगा असतील. मनीष मल्होत्रा यांनी एअर इंडियाचे कार्यालयीन कर्मचारी, इंजिनीअर आणि सुरक्षा रक्षकांचा गणवेशही डिझाईन केला आहे. तोही लवकरच प्रदर्शित केला जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा