26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषकाश्मीरमधील अपघातानंतर ध्रुव हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवले

काश्मीरमधील अपघातानंतर ध्रुव हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवले

हबर्दारीचा उपाय, कारणांचा शोध सुरु

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर गुरुवारी कोसळून गुरुवारी झालेल्या अपघातामध्ये एका जवानाला आपला जीव गमवावा लागला होता . या अपघातानंतर एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने ध्रुवचे कामकाज थांबवण्यात आल्याचे संरक्षण अधिकार्‍याने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागातील मडवा येथील मचना जंगलात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लष्कराचे हे हेलिकॉप्टर कोसळून हा अपघात झाला होता. नियमित उड्डाण केल्यानंतर १५ मिनिटांमध्येच हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आधी पायलट आणि सह-वैमानिकाने हवी नियंत्रण कक्षाला तांत्रिक बिघाडाची माहिती दिली आणि नंतर आपत्कालीन हेलिकॉप्टर प्रयत्न केला. पायलटने हेलिकॉप्टर मारुआ नदीच्या काठावर उतरवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही आणि मोठा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये पायलट, सहवैमानिक तसेच एक तंत्रज्ञ उपस्थित होते.

एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलासह लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही संरक्षण दलांद्वारे चालवले जाते.यापूर्वी मुंबईतील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराच्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली होती. यासोबतच या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

हे ही वाचा:

दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले

‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पीटर्सकडून झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता करत डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सुवर्णवेध!

अधिका-यांनी सांगितले की, उड्डाण दरम्यान तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. किश्तवाडचे एसएसपी खलील पोसवाल यांनी सांगितले की, सकाळी साडे दहा च्या सुमारास झालेल्या अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष नदीच्या काठावर सापडले. हेलिकॉप्टर अपघाताच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, गेल्या आठवड्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये कमी दृश्यमानता असलेल्या प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा