भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून हवाई दलाच्या ताफ्यात आणखी सुखोई विमाने दाखल होणार आहेत. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात करार केला आहे. ही विमाने ताफ्यात दाखल झाल्यानंतर हवाई दलाची क्षमता आणखी मजबूत होणार आहे.
भारताची हवाई शक्ती मजबूत करण्यासाठी भारताने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत १२ स्वदेशी Su- 30MKI लढाऊ विमानांसाठी १३,५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वावलंबनाच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिवाय भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशनल क्षमतांना बळ देणारा आहे. ६२.६ टक्के स्वदेशी सामग्री असलेले नवीन Su- 30MKIs भारतीय संरक्षण उद्योग भागीदारांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांसह हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक विभागात तयार केले जातील.
या कराराप्रमाणे हवाई दलाच्या ताफ्यात आणखी १२ लढाऊ सुखोई विमाने दाखल होणार आहेत. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या नाशिक विभागात या १२ लढाई विमानांची निर्मिती केली जाणार आहे. ही विमाने दाखल झाल्यानंतर हवाई दलाची क्षमता आणखी मजबूत होणार आहे.
हे ही वाचा :
सोमवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार
रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा
ठाकरे आता दोन ‘शिफ्ट’मध्ये काम करणार ?
‘महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार’
सध्या हवाई दलाच्या ताफ्यात सध्या २६० सुखोई लढाऊ विमाने आहेत. आणखी १२ विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. लढाऊ विमानासह अन्य संरक्षण सामग्रीचीही खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी १३,५०० रुपये खर्च येणार आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये सुखोई लढाई विमानांचे अन्य पार्टस्ही तयार केले जातात. आधीची सुखोई विमाने रशियन बनावटीची होती. ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे सुखोई लढाऊ विमानांमध्ये ६२ टक्के देशी सामग्रीचा वापर केला जातो. या विमानांचे निर्मितीसाठी सामग्री रशियातून आणावी लागते. पाकिस्तान आणि चीन सीमेवर करडी नजर ठेवण्यासाठी सुखोई लढाऊ विमानांची संख्या पुरेशा प्रमाणात ठेवण्याची गरज असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे.