गुजरातमध्ये कोसळलेल्या हवाई दलाच्या विमानातील जखमी पायलटचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या आणखी एका वैमानिकावर उपचार सुरू आहेत. भारतीय हवाई दलाने ट्वीटकरत याबाबत माहिती दिली. भारतीय हवाई दलाने म्हटले की, जामनगर एअरफील्डवरून उड्डाण करणारे ‘आयएएफ’चे दोन आसनी ‘विमान जग्वार’ रात्रीच्या मोहिमेदरम्यान कोसळले.
प्रत्यक्षात, वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी विमानातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी एअरफील्ड किंवा स्थानिक लोकांचे कोणतेही नुकसान होणार नाही याचीही खात्री केली. दुर्दैवाने, एका वैमानिकाला गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या पायलटवर जामनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवाई दलाला जीवितहानीबद्दल तीव्र दुःख आहे आणि शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
ट्रम्प यांच्याकडून भारतासह १८५ देशांवर परस्पर शुल्काची घोषणा; कोणता देश किती भरणार कर?
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव मध्यरात्री लोकसभेत मंजूर
Viral Video: ‘भावा तू व्हायरल होशील…’ ९ ते ५ च्या नोकरीनंतर मेट्रोमध्ये पुरूषांची अवस्था!
बिमस्टेक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी थायलंडला रवाना
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रेमसुख देलू यांनी सांगितले की, जामनगर शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या सुवर्दा गावातील एका मोकळ्या मैदानात काल (२ एप्रिल) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास लढाऊ विमान कोसळले आणि आग लागली. सुदैवाने, या अपघातामुळे जमिनीवर कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान अपघाताची कारणे देखील माहित नाहीत.