ओदिशामधील दुर्गम आणि मागासलेल्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्री वायू स्वाथ्य सेवा (एअर ऍम्ब्युलन्स सेवा) लाँच केली. सोमवारी २० डिसेंबर रोजी बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सेवा लाँच केली. पहिल्या टप्प्यात मलकानगिरी, नबरंगपूर, कालाहांडी आणि नुआपाडा या चार जिल्ह्यांतील लोकांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध असेल. एअर ऍम्ब्युलन्स सेवा देणारे ओदिशा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
या चार जिल्ह्यांतील लोकांना आता सुधारित आणि चांगल्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. या योजनेचा समाजातील दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार असून आरोग्य सेवांमधील दरी भरून निघेल, असे मत मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले.
राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास म्हणाले की, गरज भासल्यास गंभीर रुग्णांना भुवनेश्वर आणि कटक येथे या सेवेतील विमानाने नेले जाईल. या पुढाकारामुळे अशा लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळतील ज्यांना गैरसोयीमुळे योग्य उपचार मिळू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित
कट्टरपंथी झाकीर नाईकच्या संघटनेवर भारतात बंदी
मतदार ओळखपत्राला नवा ‘आधार’! लोकसभेत विधेयक मंजूर
सरसंघचालक मोहन भागवतांची तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांशी भेट
पुढच्या टप्प्यांमध्ये राज्यातील इतर जिल्हेही या सेवेमध्ये जोडले जातील. या सेवेसाठी कटक आणि भुवनेश्वर येथील वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी रुग्णालयांमधील न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.