समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होणार

महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होणार

बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण बस अपघात झाला होता. त्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून बुधवार, १२ जुलै रोजी एका खासगी बसचा अपघात झाला. वाढत्या अपघातांच्या घटना पाहता राज्य सरकारने यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर तिथे लवकर मदत पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारकडून बोलणं सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावी यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी  महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबत राज्य सरकार करार करणार आहे. तसेच अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी एअर ऍम्ब्युलन्स आणि हॉस्पिटलची सेवा मिळावा यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार आहे.

बुलाढाणा बस अपघातात २५ जण दगावले होते. अपघातग्रस्त बसमधून बाहेर पडता न आल्यामुळे आणि त्वरित मदत न पोहचल्यामुळे या २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असते त्यामुळे राज्य सरकारकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू

मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात

पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे हाहाःकार; ८६ जणांचा मृत्यू

२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात

छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा बुधवारी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून या अपघातामध्ये २० जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर गेट नंबर १६ वर अपघात झाला.

Exit mobile version