27 C
Mumbai
Friday, November 29, 2024
घरविशेष१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!

१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!

भाजपच्या स्थापनादिनी 'कमळ फुलण्याची' गोष्ट

Google News Follow

Related

आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे.६ एप्रिल १९८० रोजी भाजपाची स्थापना झाली. त्यावेळी लावलेलं लहानस रोपटं काही वर्षांनी एवढं मोठं वटवृक्ष होईल असं क्वचितच कोणाला वाटलं होतं.आज परिस्थिती अशी आहे की २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांवर आणि एनडीए आघाडी ४०० हुन अधिक जागांवर विजयाचा दावा करत आहे.भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून या गोष्टीची सुरुवात सुरु होते.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी हिंदू महासभेचा राजीनामा दिला होता.त्यानंतर संघाच्या सहकार्याने श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी २१ ऑक्टोबर १९५१ रोजी बीजेएसची (अखिल भारतीय जनसंघ) दिल्ली येथे स्थापना केली.दरम्यान, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा काश्मीर तुरुंगात मृत्यू झाला.यानंतर उपाध्यक्ष चंद्रमौली शर्मा यांना जनसंघाचे अध्यक्ष करण्यात आले.त्यांच्यानंतर प्रेमचंद्र डोगरा, आचार्य डीपी घोष, पितांबर दास, ए रामाराव, रघु वीरा, बच्छरस व्यास यांनी जनसंघाची कमान सांभाळली.

१९६६ मध्ये बलराज मधोक आणि १९६७ मध्ये दीनदयाळ उपाध्याय अध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी १९७२ पर्यंत आणि लालकृष्ण अडवाणी १९७७ पर्यंत अध्यक्षपदावर राहिले.१९७७ मध्ये भारतीय जनसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले. खर तर यावेळी देशात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले.अशा परिस्थितीत जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी विलीनीकरण करावे लागेल, अशी अट भारतीय जनसंघावर घालण्यात आली.

या अंतर्गत भारतीय जनसंघ जनता पक्षामध्ये विलीन झाला.जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाच्या बाजूने अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री झाले.अटल बिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले.पण काही काळानंतर परस्परांच्या वादामुळे १९७९ मध्ये मोरारजी देसाईंचे सरकार पडले.या स्थितीत जनता पक्षातील संघी नेत्यांना नवे व्यासपीठ निर्माण करण्याची गरज भासू लागली.अशा प्रकारे ६ एप्रिल १९८० मध्ये मुंबईत एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली, ज्याचे नाव होते ‘भारतीय जनता पार्टी’.

हे ही वाचा.. 

भारत मालदीवला पाठवणार आवश्यक वस्तू!

प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला

फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव

रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

१९८४ च्या निवडणुकीत भाजपने २ जागा जिंकल्या
१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली.अशा स्थितीत लोकसभेच्या निवणुकीत काँग्रेसला ४०० हुन अधिक जागा मिळाल्या आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.त्यावेळी भाजपाला फक्त दोन जागा मिळाल्या.१९८० पासून सलग ६ वर्षे वाजपेयी हे अध्यक्ष होते.यानंतर वाजपेयी यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी यांना अध्यक्ष पद देण्यात आले.यानंतर १९८९ मध्ये लोकसभा निवडणूक झाली तेव्हा भाजपला ८५ जागा जिंकण्यात यश आले.यानंतर भाजपचा उदय कायम राहिला.१९९१ मध्ये लोकसभेच्या १२० आणि १९९६ मध्ये १६१ जागा भाजपच्या खात्यात आल्या.अशाप्रकारे भाजप पहिल्यांदाच भारतीय संसदेत सर्वात मोठा पक्ष म्हणूंन उदयास आला.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले परंतु बहुमत नसल्यामुळे १३ दिवसांनी राजीनामा द्यावा लागला.

भाजपचा वाढता आलेख
दोन संयुक्त आघाडी सरकारे झाल्यानंतर मध्यावधी निवडणुकांसाठी एनडीएची स्थापना झाली.याबाबत शिवसेना, समता पक्ष, बिजू जनता दल, अकाली दल आणि अण्णाद्रमुक यांच्याशी करार झाला.त्यावेळी भाजपला १८२ जागा मिळाल्या आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.पण १३ महिन्यानंतर वाजपेयी सरकार पुन्हा पडले.यानंतर १९९९ मध्ये भाजपने पुन्हा बाजी मारली.एनडीएला ३०३ जागा मिळाल्या.वाजपेयींच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ १३८ जागा मिळाल्या होत्या.लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये ११६ जागा जिंकल्या होत्या.त्यानंतर २०१४ मध्ये नरेंद मोदी यांनी २८३ जागा जिंकून इतिहास रचला.भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली.यानंतर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ३०० हुन अधिक जागा जिंकून इतिहास रचला.तर एनडीएने ३५० हुन अधिक जागा जिंकल्या.आता भाजपचे लक्ष्य ४०० पार करण्याकडे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा