संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक ‘नारीशक्ती वंदन’ संमत झाले. लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली, तर ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमिन’ (एआयएमआयएम)चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी या विधेयकाला विरोध केला. या विधेयकात मुस्लिम आणि ओबीसी महिलांच्या आरक्षणाची तरतूद नसल्याने त्यांनी या विधेयकाला विरोध केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
‘आम्ही विधेयकाच्या विरुद्ध यासाठी मतदान केले की संपूर्ण देशाला हे कळावे की देशाच्या संसदेत दोन खासदार असेही आहेत की जे मुस्लिम आणि ओबीसी महिलांसाठी लढत आहेत. भारतात ओबीसी समुदायाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मग असे असताना सरकार त्यांना आरक्षण देण्यास नकार का देत आहे? देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम महिलांचे प्रमाण सात टक्के आहे. मात्र त्यांचे संसदेमधील प्रतिनिधीत्व केवळ ०.७ टक्के आहे,’ अशा शब्दांत ओवैसी यांनी बाजू मांडली.
हे ही वाचा:
भारत-कॅनडा वाद: पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर शशी थरूर यांची टीका
दहशतवादी घोषित करताच निज्जरला मिळाले होते नागरिकत्व
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत
शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !
२७ महिला खासदारांचा चर्चेत सहभाग
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महिला विधेयकावरील चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर राहुल गांधी, अमित शहा, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एकूण ६० सदस्यांनी विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये एकूण २७ महिला खासदार होत्या.
महिला आरक्षण विधेयकावर गुरुवारी चर्चा
आता महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत गुरुवारी चर्चा होईल. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सदनात ही घोषणा केली. विधेयकावर चर्चेसाठी साडेसात तासांचा कालावधी ठरवण्यात आला आहे.