ओवैसींना आला मुख्तार अन्सारीचा उमाळा

मुख्तारचा मुलगा आणि नातेवाइकांचे सांत्वन केले

ओवैसींना आला मुख्तार अन्सारीचा उमाळा

एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना कुख्यात गुंड आणि राजकारणी मुख्तार अन्सारीबद्दल उमाळा आला आहे. ओवैसी हे अन्सारीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री गाझीपूरला पोहोचले. त्यांनी अन्सारीच्या मोहम्मदाबाद येथील घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेतली. मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि मुख्तारचा मुलगा आणि नातेवाइकांचेही सांत्वन केले.

मुख्तारच्या घरी ते उशिरा पोहोचले. या पार्श्वभूमीवर तेथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आवश्यकता भासल्यास अन्य सुरक्षा दलही तैनात करण्यात आले होते. तेव्हा अन्सारीच्या घराबाहेर खूप गर्दी झाली होती. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्टही केली. ‘आज मुख्तार अन्सारी यांच्या गाजीपूरमधील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अशा कठीण समयी आम्ही त्यांचे कुटुंब, समर्थक आणि चाहत्यांच्या पाठिशी आहोत,’ असे त्यांनी नमूद केले होते.

हे ही वाचा:

सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप

छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!

‘काही व्यक्तींकडून चुका होतात…’ संदेशखालीतील घटनांना सौम्य करण्याचा प्रयत्न

‘काही व्यक्तींकडून चुका होतात…’ संदेशखालीतील घटनांना सौम्य करण्याचा प्रयत्न

गेल्या गुरुवारी जेव्हा अन्सारीचा मृत्यू झाला होता तेव्हाही ओवैसी यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली होती आणि अन्सारीवर योग्य प्रकारे उपचार न झाल्याचा आरोप केला होता. गाझीपूरच्या जनतेने त्यांच्या लाडक्या मुलाला व भावाला गमावले आहे. त्यांच्यावर विषप्रयोग केला जात होता. मात्र तरीही सरकारने त्यांच्यावर योग्य ते उपचार केले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मुख्तार याच्यावर जेवणातून विषप्रयोग केला जात असल्याचा आरोप केला जात असून त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.

Exit mobile version