दिल्लीतील प्रसिद्ध अशा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात ‘एम्स’ च्या विद्यार्थ्यांनी जगभर पवित्र मानल्या जाणाऱ्या रामायणाची खिल्ली उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एम्स मध्ये प्रथम वर्षाला वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार केल्याचे समजते.
समोर आलेल्या माहितीनुसार एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणारा विद्यार्थी शोएब आफ्ताब याने एक रामलीला कार्यक्रम आयोजित केला होता. शोएब हा नीट परिक्षेत देशात पहिला आलेला विद्यार्थी आहे. या ‘रामलीला’ मध्ये रामायणातील प्रसंगांची खिल्ली उडवण्यात आली. तर रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह वाक्य देण्यात आली होती. समाज माध्यमांवर या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या संपूर्ण प्रकाराबद्दल समाज माध्यमातून तीव्र टीका होताना दिसत आहे. पवित्र अशा रामायणा बाबत अशा तऱ्हेचे अपमानकारक सादरीकरण सहन केले जाऊ नये असा नेटकऱ्यांचा सूर दिसत आहे. तर या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणीही नेटकरी करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेस नेता म्हणाला, इस्लामिक अजेंडा राबवला जातोय!
उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनाच्यावेळी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब हल्ला!
‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’
या सर्व प्रकाराबद्दल दिल्लीतील एम्सच्या विद्यार्थी संघटनेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या आक्षेपार्ह सादरीकरणासाठी माफी मागतो. त्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता असे या विद्यार्थी संघाने म्हटले आहे. तर भविष्यात असे प्रकार ‘एम्स’ मध्ये घडणार नाहीत असे सांगितले आहे.
दरम्यान या प्रकरणावरून ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. #ArrestAIIMSCulprits असा हॅशटॅग वापरून ट्विटरवर नेटकरी आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी देखील या संदर्भात ट्विट केले आहे.
This Aftab Soyeb seems to be a repeat offender. This repeated mocking of Hindu Gods with an agenda is despicable. It is important that the focus be kept on Aftab’s actions rather than mocking Unacademy. Need strong actions against Aftab #ArrestAIIMSCulprits
— Kaushal S Inamdar| कौशल इनामदार (@ksinamdar) October 17, 2021