कृत्रिम बुद्धिमता (AI) क्षेत्रात भारताची यशस्वी वाटचाल सुरू असून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजने विकसित केलेल्या ‘आदिपोली’ नावाच्या भारतातील पहिल्या पूर्णपणे डिझाइन केलेल्या एआय सर्व्हरचे प्रदर्शन केले. या माध्यामातून ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला चालना मिळाली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले की ‘आदिपोली’ हा एआय सर्व्हर ८ जीपीयूने सुसज्ज आहे. शिवाय हा पूर्णपणे भारतात डिझाइन केलेला आहे. हा सर्व्हर प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये देशाच्या वाढत्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी हा सर्व्हर एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
India’s AI server… ‘Adipoli’ 👍
at VVDN Technologies pic.twitter.com/dJcRDxNYhx
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 18, 2025
भारतीय बनावटीची इलेक्ट्रॉनिक उत्पादने अधिकाधिक विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होत आहेत हे देखील अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे आणि देशात नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळत असल्याचे अश्विनी वैष्णव म्हणाले. मानेसर येथील व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या ग्लोबल इनोव्हेशन पार्कमध्ये त्यांनी एका नवीन एसएमटी (सरफेस माउंट टेक्नॉलॉजी) लाइनचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत होत असलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचा एलोन मस्क यांना फोन; कोणत्या विषयांवर केली चर्चा?
स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून…भारताने बांगलादेशला खडसावले
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
हमासने गुडघे टेकले; युद्ध समाप्तीच्या बदल्यात उर्वरित सर्व बंधकांना मुक्त करण्याची तयारी
“काही काळापासून, भारताने इलेक्ट्रॉनिक्स डिझाइनमध्ये मजबूत क्षमता विकसित केल्या आहेत. या क्षमतांमध्ये आता ऑटोमोबाईल क्षेत्र, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नलिंग आणि सुरक्षा प्रणालींशी संबंधित उत्पादने समाविष्ट आहेत. अशा उत्पादनांचे डिझाइन आणि उत्पादन भारतात वाढत आहे, जे पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण यश आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.