भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार

जी- २० बैठकीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार

सध्या जगभरामध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने विकसित केलेल्या AI आधारित प्लॅटफॉर्मची घोषणा केली. शनिवार, १९ ऑगस्ट रोजी जी- २० डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना AI आधारित ‘भाषिणी’ (Bhashini) या प्लॅटफॉर्मची पंतप्रधान मोदींनी घोषणा केली. ‘भाषिणी’ हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे  येथे अनेक जाती धर्मांच लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित ‘भाषिणी’ टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.

हे ही वाचा:

रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो

देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही

रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’

उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

प्राचीन परंपरांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत भारतात प्रत्येकासाठी काही ना काही आहे. इतक्या विविधतेसह, भारत ही अशा प्रयोगांसाठी एक आदर्श चाचणी प्रयोगशाळा आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भारताच्या वेगवान डिजिटलायझेशनबद्दलही सांगितले.  भारतात ८५ कोटी इंटरनेट वापरकर्ते असून जगातील सर्वात स्वस्त डेटाचा आनंद ते घेत आहेत.

Exit mobile version