अहमदनगर जिल्ह्या आता ‘अहिल्यानगर’ नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. यावरून जनतेसह नेत्यांनी देखील केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीटकरत नामांतराची माहिती दिली.
एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्यानंतर आज अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ केल्याने जिल्ह्यासह राज्यात आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्यानंतर आता अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. आज अखेर मागणीला यश आले आहे, अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखले जाणार आहे.
हे ही वाचा :
काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छिते!
आमदार अतुल भातखळकरांच्या मागणीला यश, ‘अकृषिक कर रद्द’
अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान
ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीटकरत म्हटले, अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती. नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार.
अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!!
नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे…— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) October 4, 2024