अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड, राज्य मंत्रिमंडळातील निर्णय

अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, १३ मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. अशातच अनेक महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारने या बैठकीत घेतले आहेत.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला ‘राजगड’ किल्ल्याचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते असताना त्यांनी आणि नागरिकांनी केली होती.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख

  1. करी रोड- लालबाग
  2. सँडहर्स्ट रोड- डोंगरी
  3. मरीन लाईन्स- मुंबादेवी
  4. चर्नी रोड- गिरगाव
  5. कॉटन ग्रीन- काळाचौकी
  6. डॉकयार्ड रोड- माझगाव
  7. किंग्ज सर्कल- तीर्थंकर पार्श्वनाथ
  8. मुंबई सेंट्रल- नाना शंकरशेठ

हे ही वाचा:

संसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!

Exit mobile version