22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषअहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही

हॉस्पिटलच्या बेसमेंट ठेवलेल्या वस्तुंना लागली आग,कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील साहिबाग परिसरात असलेल्या राजस्थान रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये पहाटे ४.३० वाजता आग लागली. रुग्णालयामध्ये सुरु असलेल्या नुतनीकरणाच्या कामामुळे बेसमेंटमध्ये ठेवलेल्या अनेक वस्तूंना आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धूर झाला, असं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार, १२५ रुग्णांना सुखरुप रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

शाहीबाग परिसरात असलेल्या राजस्थान रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये पहाटे ४.३० वाजता ही आग लागली.हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या असल्याने त्याला आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नसून १२५ रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या २०-२५ गाड्या घटनास्थळी हजर आहेत. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितलं की, राजस्थान रुग्णालयाच्या तळघरात पहाटे साडेचार वाजता आग लागली आणि या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

हे ही वाचा:

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक

राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन

भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध

राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील

 

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात काही पुनर्बांधणीचं काम सुरु होतं, त्यामुळे रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.बेसमेंटमधील याच वस्तुंना आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. रुग्णांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.शाहीबाग पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर एमडी चंपावत यांनी सांगितलं की, अग्निशमन दलाच्या २० ते २५ गाड्या घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून बेसमेंटमधील वस्तूं आगीत जळून खाक झाले आहे.

 

 

हे राजस्थान रुग्णालय एका चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवलं जात आहे. बेसमेंटमध्ये सुरु असलेल्या नुतनीकरणाच्या कामामुळे बेसमेंटमध्ये ठेवलेल्या वस्तूंना आग लागली, त्यामुळे बेसमेंटमध्ये धुराचे प्रचंड लोट पसरले.बेसमेंटला लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बेसमेंटमध्ये लागलेली आग वरील मजल्यांपर्यंत भडकली. त्यानंतर लगेच खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढून दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आलं, आता त्यांच्यावर सुरळीत उपचार सुरु आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा