अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चेला ऊत

गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर

अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चेला ऊत

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शनिवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या या भेटीवरून राज्यात राजकीय चर्चेला ऊत आला आहे मात्र गृहमंत्री अमित शहा यांच्या नियाेजित मुंबई दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासंदर्भात ही मुंबई भेट असल्याचे बाेलले जात आहे . मुंबइत आल्यावर डाेवाल यांनी सर्वप्रथम राजभवनात जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

सणासुदीच्या काळात भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आलेल्या धमक्या आणि संकेतांच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत या भेटीत चर्चा केली असल्याचं म्हटल्या जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या भेटीची छायाचित्रे ट्विट करण्यात आली आहेत. एका चित्रात अजित डोवाल राज्यपालांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. दुसऱ्या चित्रात दोघांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. राज्यपाल कार्यालयाने ही बैठक सदिच्छा भेट असल्याचे सांगितले आहे. शनिवारी सकाळीच ही बैठक झाली.

काही दिवसांपूर्वी मस्कतहून एक बोट मुंबईला लागून असलेल्या रायगड परिसरातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आली होती. बोटीतून तीन एके-४७ रायफल आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर विधानसभेत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची होती जी मस्कतहून युरोपला जाताना भरकटली होती. यानंतर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानकडून धमकीचा संदेश मिळाला होता, ज्यामध्ये देशातील १० लोकांच्या मदतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची योजना असल्याचे सांगण्यात आले होते.  त्या मेसेजमध्ये देशातील १० नंबरही पाठवण्यात आले होते. दरम्यान, मुंबईत पुन्हा एकदा सोमालियासारखा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. सुरक्षेशी संबंधित या सर्व बाबी लक्षात घेता सुरक्षिततेचा आढावा हेच अजित डोवाल यांच्या मुंबई भेटीचे महत्त्व आहे.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

 

भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर अमित शहा यांचा दौरा होत आहे. अशा स्थितीत राजकीय वर्तुळात अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटाची रणनीती काय असेल आणि कोणत्या पक्षाला एकत्र आणायचे याबाबत सविस्तर चर्चा या भेटीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गणेशाेत्सवाच्या निमित्ताने भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाच्या निमित्ताने त्यांची भेट घेतली हाेती. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला साेबत घेण्याची चर्चाही सध्या रंगली आहे.

Exit mobile version