राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी क्वारंटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.सध्या मंत्री मुंडे हे पुण्यातील आपल्या घरी क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरी औषध उपचार सुरु आहेत.
नुकताच दोन वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला. मात्र, कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही. देशभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकं वर काढलं आहे. जेएन.१ (JN.१)या नव्या सब व्हेरियंटने देशभरात शिरकाव करायला सुरुवात केली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत सावधगिरी बाळगावी असे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मी देशभक्त की देशद्रोही, हे जनता ठरवेल!
राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत
काँग्रेस नेते सुनील केदारांची आमदारकी रद्द, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा!
हिजाब बंदीवरून सिद्धरामय्या यांचा युटर्न
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता.त्यांची तपासणी केली असता मुंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.मुंडे त्यांच्या पुण्यातील घरी क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.डब्लूएचओ च्या रिपोर्टनुसार, या महिन्यात कोरोनाच्या जेएन. १ व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये २६ टक्के वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. पण ज्याप्रकारे रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता डब्लूएचओने सर्व देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.