राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी देश सज्ज असताना आग्रा येथील रहिवासी असलेली एक महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी रेशीम वस्त्रे शिवत आहे. अयोध्येत २२ जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख अगदी जवळ आली आहे.देशभरातील राम भक्त आनंदी आहेत.सोहळ्यापूर्वीच अनेक भाविक अयोध्येत ये-जा करत आहेत.अशातच आग्रा येथील दयालबाग भागातील रहिवासी असलेली एकता या महिलेने प्रभू राम मंदिर सोहळ्याची तारीख जाहीर झाल्यापासून रामलल्लासाठी रेशीम आणि लोकरीचे वस्त्र शिवण्यास सुरुवात केली आहे.तिने तयारी केलेली वस्त्रे राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी प्रभू रामासाठी निवडले जातील अशी आशा तिने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!
शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावमध्ये दाखल
‘टीम इंडियाचे नक्कीच काहीतरी बिनसलेय…’
नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघ राहणार ‘बिझी’
एकता म्हणाली की, सुरुवातीला तिला रामलल्लाच्या मूर्तीच्या आकाराची कल्पना नव्हती, म्हणून तिने सर्व आकाराचे कपडे बनवायला सुरुवात केली. जेंव्हा कोणी अयोध्येला जाऊन बांधकाम सुरू असलेले मंदिर पाहून परत येत असे तेव्हा ती त्या व्यक्तीला भेटून मूर्तीच्या आकाराची कल्पना घेण्याचा प्रयत्न आकारून तशी वस्त्रे तयार करत असे.
आतापर्यंत तिने देवतेच्या मूर्तीसाठी सुमारे डझनभर रेशीम आणि लोकरीचे वस्त्रे तयार केले आहेत आणि २२ जानेवारीला हे कपडे मंदिर ट्रस्टला भेट देण्याचा तिचा मानस आहे.अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ती तिच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील मंदिरात जाणार आहे.