22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषअग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची ‘पासिंग आऊट परेड’

जवळपास अडीच हजार अग्निवीरांमध्ये २७३ महिलांचाही असेल समावेश. सर्वांनाच लागली उत्सुकता

Google News Follow

Related

अग्निवीरांच्या प्रशिक्षण आणि भर्तीविषयक गेल्या काही महिन्यात बरीच चर्चा झाली. त्यातून आता अग्निवीरांची पहिली तुकडी सज्ज झाली असून त्यांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर पहिले पथसंचलन अर्थात पासिंग आऊट परेड होत आहे.

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षणोत्तर पथसंचलन म्हणजेच पासिंग आऊट परेड येत्या २८ मार्च रोजी आयएनएस चिल्का इथे होणार आहे. सुमारे २७३ महिलांसह २५६०० अग्निवीरांचा त्यात समावेश आहे.  त्यांनी चिल्का इथे सुरु असलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हे पथसंचलन होणार आहे.

नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार या पासिंग आऊट परेड समारंभाचे मुख्य अतिथी असतील आणि यावेळी होणाऱ्या पथसंचलनाचे ते अवलोकन करतील.दक्षिण नौदल विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल एमए हम्पीहोळी, दक्षिण नौदल विभागासह अनेक इतर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि मान्यवर देखील यावेळी उपस्थित असतील. यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढच्या सागरी प्रशिक्षणासाठी किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.

ही असतील ठळक वैशिष्ट्ये

पासिंग आऊट परेड हा प्रशिक्षणार्थींसाठी एक अविस्मरणीय प्रसंग आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण असतो. प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर देशातील कोणत्याही प्रशिक्षण संस्थेतून अग्निवीर उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे – सशस्त्र सैन्यदले आणि राष्ट्रासाठी नवीन सुरुवात करण्याच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा आहे.

हे ही वाचा:

खलिस्तानींच्या हल्ल्यांविरोधात भारताने कॅनडा सरकारला ठणकावले!

करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती

हक्कभंगप्रकरणी संजय राऊत यांचा खुलासा समाधानकारक नाही, म्हणून…

बीबीसीचा निषेध! निषेध!! पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याबद्दल निंदाव्यजक ठराव

या पासिंग आऊट परेडदरम्यान आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पात्र अग्निवीरांना पुरस्कार प्रदान केले जातील.
देशाचे पहिले सीडीएस म्हणजे संरक्षण दल प्रमुख, दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी अग्निवीर योजनेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, भारतीय नौदलाने यावर्षीपासून जनरल बिपिन रावत फिरता चषक पुरस्कार सुरु केला असून, ‘सर्वोत्कृष्ट क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या महिला अग्निवीर प्रशिक्षणार्थीला दिवंगत जनरल रावत यांच्या मुलींकडून हा चषक प्रदान केला जाईल.

या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी, या पासिंग आऊट परेडला नौदलातील अनेक ज्येष्ठ नौदल कर्मचारी, ज्यांनी आपल्या सेवा काळात आणि त्यानंतरही, उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना आणि महिला क्रीडापटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा