मध्य प्रदेशच्या मोहन यादव सरकारने अग्निविरांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस भरतीत अग्नीवर जवानांना आरक्षण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याची घोषणा केली. मुख्यमंत्री यादव यांनी ट्विटकरत “कारगिल विजय दिवसानिमित्त अग्निविरांसाठी राज्यातील पोलीस दल आणि
सशस्त्र दलांच्या भरतीत आरक्षण देणार असल्याची सांगितले.
मोदी सरकारने सुरू केलेल्या अग्निवीर योजनेद्वारे आता अनेक अग्नीवर जवानांना राज्यातील पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. अनेक राज्यांनी अग्निविरांसाठी पोलीस दल, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केले आहेत. तसेच अनेक राज्य राज्यातील सरकार पोलीस दलात अग्निविरांसाठी आरक्षण देण्याची घोषणा करत आहेत. मध्य प्रदेश सरकारने देखील आता राज्यातील पोलीस दलात अग्निविरांसाठी आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री यादव यांनी टट्विट करत याची माहिती दिली.
मुख्यमंत्री यादव म्हणाले की, “आज कारगिल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावनेनुसार, पोलीस आणि सशस्त्र दलाच्या भरतीमध्ये अग्निवीर सैनिकांना आरक्षण देण्याचा मध्य प्रदेश सरकारने निर्णय घेतला आहे. या योजनेचे फायदे सांगताना. मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, “अग्नवीर जवान ही योजना खऱ्या अर्थाने सक्षम सैनिकांच्या भरतीसह लष्कराचे आधुनिकीकरण आणि लष्कराला जागतिक स्तरावर तरुण बनविण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शहापूरला पर्यटनाचा तालुका म्हणून घोषित करा
बांगलादेशला नमवत भारतीय महिला संघाची आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे लाईन्सवर हल्ला
केंद्रीय मंत्री गडकरींचा टोलबाबत मोठा निर्णय, ‘टोल व्यवस्था केली रद्द’
दरम्यान, मध्य प्रदेश व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारनेही यूपी पोलिसांमध्ये अग्निशमन दलासाठी आरक्षण जाहीर केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली की यूपीमध्ये अग्निशमन दलाला पोलीस आणि पीएसीमध्ये आरक्षण दिले जाईल.
आज कारगिल दिवस के अवसर पर हमारी सरकार ने निर्णय किया है कि यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की मंशानुसार अग्निवीर जवानों को पुलिस एवं सशस्त्र बलों की भर्ती में आरक्षण दिया जाएगा। #KargilVijayDiwas#DrMohanYadav #CMMadhyaPradesh pic.twitter.com/HSrT2Qkyvg
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) July 26, 2024