ज्वेलर्सच्या दुकानावरील दरोड्यात अग्निवीराचा सहभाग, ५० लाखांचे दागिने केले लंपास !

अग्नीविरासह सहा जणांना अटक

ज्वेलर्सच्या दुकानावरील दरोड्यात अग्निवीराचा सहभाग, ५० लाखांचे दागिने केले लंपास !

भोपाळमधील एका दागिन्यांच्या दुकानात घुसून आणि दुकानातील कर्मचाऱ्याला बंदुकीच्या धाकावर धरून ५० लाखांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोकड लुटल्याप्रकरणी भारतीय लष्करातील अग्नीविरासह इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मोहितसिंग बघेल (अग्निवीर) पंजाबच्या पठाणकोटमध्ये तैनात होता आणि तो रजेवर होता आणि आपल्या भावाला भेटण्यासाठी भोपाळला गेला होता. आरोपी अग्नीविराच्या दाजीवर घराचे कर्ज होते. त्यामुळे दाजीच्या घराचे कर्ज फेडून उरलेल्या पैशातून आनंद लुटायचा या उद्देशाने आरोपी अग्नीविराने दरोड्याची योजना आखली होती, असे मिश्रा यांनी सांगितले.

आरोपी अग्नीविर आणि त्याचा मित्र आकाश राय या दोघांनी १३ ऑगस्ट रोजी ज्वेलरी शॉपवर दरोडा टाकला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये आरोपी अग्नीविर अन साथीदार आकाश राय हे दोघेही हेल्मेट घातलेले असून ते दुकानातील कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहेत. ज्वेलर्स दुकानदारावर पिस्तुल दागून दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी करताना आरोपी अग्नीवर सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

हे ही वाचा..

नाशिकमध्ये दोन महिलांसह तीन बांग्लादेशींना अटक !

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे नागरिकत्व मागणाऱ्यांना न्याय नाही

 

पोलीस आयुक्त मिश्रा यांनी सांगितले की, दोघांनी दागिने आणि रोख घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गुन्ह्याच्या ठिकाणापासून २० किलोमीटरच्या परिघात बसवलेले सुमारे ४०० सीसीटीव्ही स्कॅन करण्यास सुरुवात केली. चार पोलिस पथकांनी सीसीटीव्ही स्कॅन केले असता आरोपी अग्नीविर बघेलची ओळख पटली. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्यासाठी ५०,००० रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अग्नीविराने दरोड्याचा कट रचला होता आणि गुन्हा करण्यापूर्वी रात्री दागिन्यांच्या दुकानाची रेकी करत असे. पोलीस आयुक्त मिश्रा म्हणाले की, आरोपी मोहितसिंग बघेल या अग्नीविराची संपूर्ण माहिती भारतीय लष्कराकडून मागवण्यात आली आहे.

आरोपी अग्निविरासह आणि मित्र आकाश राय याच्याशिवाय, विकास राय (आकाश रायचा भाऊ), मोनिका राय (आकाश रायची बहीण), अमित राय (आकाश रायचा मेहुणा), गायत्री राय (आकाश रायचा भाऊ), अभय मिश्रा ( अग्नीविराला चोरीसाठी बंदूक दिली) यांना देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींनी लुटलेली रोकड आणि दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत.

Exit mobile version