‘अग्निपथ योजनेला सर्वांचीच मान्यता’

लष्करप्रमुख मनोज पांडे यांचे स्पष्टीकरण

‘अग्निपथ योजनेला सर्वांचीच मान्यता’

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी त्यांच्या आगामी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात अग्निपथ योजनेमुळे लष्करासह हवाई आणि नौदलातील अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता, असे लिहिले आहे. मात्र अग्निपथ योजनेला सर्वांचीच मान्यता होती, असे लष्कप्रमुख मनोज मांडे यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारीला होणाऱ्या लष्करी दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या वक्तव्याबाबत त्यांना विचारण्यात आले. मात्र ‘याबाबत मी बोलणे उचित ठरणार नाही. तरीही मी हे स्पष्ट करू इच्छितो की, अग्निपथ योजनेचा अंतिम आराखडा, त्याची रचना याबाबत चर्चा, सल्लामसलत केल्यानंतर आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करूनच मंजूर झाला होता,’ असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

नरवणे यांनी पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, अग्निपथ योजनेत सुरुवातीला ७५ टक्के सैनिकांना लष्करसेवेत कायम ठेवण्याचा आणि २५ टक्के जणांना मोकळे करण्याचा प्रस्ताव होता. लष्करप्रमुख पांडे यांनी मात्र अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात भरती होणाऱ्या अग्निवीरांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट केले. ‘आता आपल्याला पुढे जावे लागेल आणि स्वीकारार्हता, सकारात्मकता आणि आता ही योजना आपली असल्याचे मानून या अग्निवीरांना सामावून घेतले पाहिजे,’ असे पांडे यांनी स्पष्ट केले.

जून २०२२मध्ये अग्निपथ प्रारूप आणून कित्येक दशके जुनी लष्करीभरतीची योजना बंद करण्यात आली. नव्या योजनेंतर्गत सैनिक आता लष्करात केवळ चार वर्षेच राहू शकतात. तसेच, त्यातील २५ टक्के सैनिकांना नियमित लष्करी सेवेत कायम राहतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या दृष्टीने काही आव्हाने आहेत, परंतु यापैकी बहुतांश व्यूहात्मक पातळीवरील आहेत, असे पांडे म्हणाले.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!

‘यामध्ये तुम्ही मर्यादित प्रशिक्षण कालावधीचा सामना कसा करता, याच्या दृष्टीने आमच्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसेच, अग्निवीर आणि नियमित सैनिक यांच्यातील शारीरिक बळ आणि गोळीबाराची मानके यातूनही आम्ही तोडगा काढत आहोत. तसेच, या समस्या वेतन आणि भत्ते यांसारख्या व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अधिक आहेत. जसजसे आम्ही अधिकाधिक प्रशिक्षण घेत आहोत, त्यातून आम्हाला जसजसा प्रतिसाद मिळतोय, ते मुद्दे आम्ही पुढे आणत आहोत,’ असे लष्करप्रमुख म्हणाले.

Exit mobile version