कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी केरळमधील तांत्रिकाचा वापर करून काळी जादू केली जात असल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गुरुवारी केला. आपल्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्याविरुद्ध ‘शत्रु बैरवी यज्ञ’ करण्यासाठी केरळच्या तांत्रिकांचा वापर केला जात आहे. तरीही आमचे रक्षण देव आणि लोकांकडून मिळणारे आशीर्वाद करतील यावर आमचा विश्वास आहे.
शिवकुमार यांनी दावा केला की कर्नाटकातील आमचे सरकार अस्थिर करण्यासाठी केरळमधील राजा राजेश्वरी मंदिराजवळ एका निर्जन ठिकाणी काळ्या जादूचे विधी केले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ते ‘राजा कंटक’ आणि ‘मरण मोहना स्तंभना’ यज्ञ करण्यासाठी तांत्रिकांचा वापर करत आहेत. काळ्या जादूच्या विधीची माहिती असलेल्या लोकांनी आम्हाला सर्व माहिती दिली आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा..
हिंदू मुलावर मुस्लीम जमावाकडून जीवघेणा हल्ला
लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई
लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त
एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले
शिवकुमार म्हणाले की, ‘अघोरी’ यज्ञ करण्यात असून काळ्या जादूसाठी २१ लाल बकऱ्या, तीन म्हशी, २१ काळ्या मेंढ्या आणि पाच डुकरांचा बळी दिला जात आहे. हे यज्ञ अघोरींमार्फत केले जात आहेत आणि आमच्याकडे अशी माहिती आहे की पंचबली – २१ लाल बकऱ्या, ३ म्हशी, २१ काळ्या मेंढ्या आणि ५ डुकरांचा – काळ्या जादूसाठी बळी दिला जात आहे.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, हानी पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न आणि प्रयोग असूनही, ज्या शक्तीवर त्यांचा विश्वास आहे ते त्यांचे संरक्षण करेल. त्यांना काळी जादू करू द्या, हा त्यांचा विश्वास आहे. ज्या शक्तीवर आपण विश्वास ठेवतो ती शक्ती आपले रक्षण करेल. घर सोडण्यापूर्वी मी नेहमी देवाची प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
ही जादू भाजप किंवा जेडीएसने चालवली आहे का, असे विचारले असता त्यांनी कर्नाटकातील राजकारणी जबाबदार असल्याचे सांगितले. आम्हाला माहित आहे की हे कोण करत आहे. राजकीयदृष्ट्या सक्रिय लोकांना वारंवार लक्ष्य केले जाते. हा विधी कोण करत आहे हे मला माहीत आहे. त्यांना त्यांचे प्रयत्न चालू द्या; मला त्रास होत नाही, असेही ते म्हणाले.