त्रिपुरा राज्यातील धर्मनगर रेल्वे स्थानकावर शनिवारी (७ सप्टेंबर) अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. स्टेशन रोडजवळ या चौघांचे संशयास्पद वर्तन आढळल्याने गस्ती पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
मोहम्मद हनिफ, युसूफ अली, पारुल बेगम आणि जस्मिन अख्तर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची आणि बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याची कबुली दिली. चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीडियाशी बोलताना एका बांगलादेशी नागरिकाने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी एका एजंटने (रुबेल) आम्हाला रात्री उशिरा येथे आणले. त्रिपुराच्या कोणत्या भागात आम्ही आलो याची आम्हाला माहिती नाही. पण आम्हाला शनिवारी ट्रेनने बेंगळुरूला जायचे होते.
हे ही वाचा :
महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा नरेंद्र मोदींवर विश्वास!
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !
भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !
बांगलादेशात सत्ताबदलानंतर तेथील परिस्थिती अत्यंत खराब झाल्याचे त्याने सांगितले, रोजगाराच्या संधी देखील कमी झाल्याचे त्याने सांगितले. अशा परिस्थितीमुळे भारतात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोपीने सांगितले.
एका आरोपीने सांगितले की, मानवी तस्करांपैकी एकाने धर्मनगर रेल्वे स्थानकावर आम्हाला सोडले आणि निघून गेला. आम्ही त्याची वात बघत होतो, तोपर्यंत पोलिसांनी पकडले. दरम्यान, अटक करण्यात आलेले चौघेही बांगलादेशच्या खुलना विभागातील बागेरहाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.