26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषविराट कोहलीच्या पाठोपाठ रोहित शर्माचीही टी २०मधून निवृत्ती

विराट कोहलीच्या पाठोपाठ रोहित शर्माचीही टी २०मधून निवृत्ती

टी-२० वर्ल्डकप विजयानंतर घेतला निर्णय

Google News Follow

Related

विराट कोहलीने टी २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही शनिवारी टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. भारताने टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर या दोन्ही क्रिकेटपटूंनी टी २० मधील त्यांचा प्रवास आपण थांबवत असल्याची घोषणा केली.

बार्बाडोसमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. केनसिंग्टन ओव्हलवर सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर कोहलीने टी २०मधून निवृत्ती जाहीर केली. तर रोहितने विजयानंतर पत्रकारांना संबोधित करताना निवृत्ती जाहीर केली. ‘हा माझाही शेवटचा खेळ होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी जेव्हापासून या प्रकारामध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून मी त्याचा आनंद लुटत आहे. या प्रकाराला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही. मला त्यातील प्रत्येक क्षण आवडला आहे. माझ्या भारतातील कारकिर्दीची सुरुवात या खेळाच्या प्रकारातूनच झाली आहे आणि या प्रकारामधील चषक जिंकूनच मला टी२०ला निरोप द्यायचा होता,’ असे रोहितने जाहीर केले. अर्थात तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळतच राहील, असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. त्याने केवळ फक्त टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन भारताला विश्वचषक जिंकून दिला आहे. कोहलीने या सामन्यात ५९ चेंडूंत ७६ धावा केल्या. ज्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने या रोमहर्षक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून दुसरा टी २० विश्वचषक जिंकला.
दुसरीकडे रोहित शर्माने संघाचा कर्णधार म्हणून विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. सन २०२२मध्ये टी २० विश्वचषक उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर, भारताने २०२३मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि मायदेशात एकदिवसीय विश्वचषक गमावला. दोन्ही प्रसंगांत ते ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले.

हे ही वाचा:

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

पंतप्रधानांचा खास संदेश, ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’

मनी लाँडरिंग, दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक

लडाखमध्ये रणगाडा सरावावेळी भारतीय सैन्याच्या पाच जवानांना हौतात्म्य !

मला कसेही करून जिंकायचे होते: रोहित

शेवटचा चेंडू टाकल्यानंतर रोहित शर्माने आनंदात मैदानावर धाव घेतली. बक्षीस समारंभात रोहितने टी २० विश्वचषक घेताना त्याने त्याच्या स्टाइलमध्ये नृत्य केले. केन्सिंग्टन ओव्हलवर दोघांनी एकत्र भारतीय तिरंगा हातात धरला आणि विराट कोहलीसोबत छायाचित्रही काढले. ‘मला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे होते. ते शब्दांत मांडणे खूप कठीण होते. त्या क्षणी माझ्या मनात काय चालले होते ते कसे व्यक्त करावे हे मला कळत नव्हते. तो खूप भावनिक क्षण होता. तो क्षण मी स्वतः टिपू शकलो असतो तर, पण नाही, त्यावेळी तसं करता येत नाही,’ अशा शब्दांत रोहितने त्याच्या भावना व्यक्त केल्या. रोहित शर्माने ४२३१ धावांसह टी-२० कारकीर्दीला निरोप दिला. त्याने येथे पाच शतके ठोकली असून टी-२० क्रिकेटमधील एका फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक आहेत. रोहितने १४०च्या स्ट्राइक गतीने ३२ फटके मारले.
रोहितने २०२४च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलामीला येऊन गोलंदाजांची पिसे काढली. रोहितने आठ सामन्यांत १५६.७०च्या स्ट्राईक रेटने २५७ धावा तडकावल्या. तर, विराट कोहलीने १२५ सामन्यांत ४१८८ धावा करत कारकीर्द पूर्ण केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा