इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा यांच्या हाकेवर बरेलीमधील इस्लामिया ग्राऊंडवर जमलेल्या जमावाने परतत असताना अचानक गोंधळ घातला.शुक्रवारच्या नमाज अदाकेल्यानंतर ही घटना घडली.जमावाने घोषणाबाजी करत हुल्लडबाजी केली.या दरम्यान दोन तरुणांना पकडून बेदम मारहाण केली.दुचाकीचेही नुकसान करण्यात आले.दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ज्ञानव्यापी प्रकरणातील न्यायालयाच्या निकालामुळे संतप्त झालेल्या आयएमसी प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी शुक्रवारच्या नमाजानंतर ‘जेल भरो आंदोलन’ सुरु करणार असल्याची घोषणा केली आणि सर्वाना इस्लामिया मैदानात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) दुपारी जीआयसी सभागृहासमोरील मशिदीत नमाज अदाकेल्यानंतर मौलाना तौकीर ‘जेल भरो आंदोलनासाठी आपल्या सहकाऱ्यांसह इस्लामिया मैदानाकडे निघले.परंतु बिहारीपूर पोलीस चौकीजवळ त्यांना अटक करण्यात आली.यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ सोडून दिले व त्यांना घरी पाठवण्यात आले.
हे ही वाचा..
निखिल वागळेंविरोधात गुन्हा दाखल
पाकिस्तान्यांनी दहशतवाद्याला नाकारलं; हाफिज सईदच्या मुलाचा दारूण पराभव
अभिषेक घोसाळकरांची हत्या ही उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरचे परिणाम!
काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!
दरम्यान, मौलाना तौकीर रझा यांना अटक केल्याची बातमी समजताच मैदानात जमलेल्या जमावाने एकच गोंधळ घातला.जमावाकडून नारे बाजी करण्यात अली.परंतु, मौलाना तौकीर यांना पोलिसांनी सोडून दिले असून ते घरी गेल्याचे समजताच मैदानातील जमाव शांत झाला आणि आपआपल्या घरी परतला.जमाव परतत असताना श्यामगंज परिसरात आला आणि एकच गोंधळ उडाला.मौलाना इंटर कॉलेजसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांना जमावाने अडवले आणि त्यांना बेदम मारहाण केली.त्यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली.यानंतर त्याठिकाणी तोडफोड सुरु झाली.परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा जमावाकडून फोडण्यात आल्या.या घटनेची माहिती मिळताच श्यामगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस घटनास्थळी दाखल होताच जमावाने पळ काढला.दरम्यान, परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे श्यामगंज पोलिसांनी सांगितले आहे.