मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पाठोपाठ आता मुंबई -पुणे प्रगती एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडला जाणार आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वे कडे चार विस्टाडोम गाड्यांची संख्या झाली आहे.
तब्बल अडीच वर्षा नंतर मुंबई-पुणेदरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस अखेर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. याशिवाय या एक्स्प्रेसला ‘एलएचबी’ मध्ये रुपांतर करून ह्या ट्रेनला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक १२१२५ प्रगती एक्सप्रेस २५ जुलै २०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र
“भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्याचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल”
अशा प्रकारे असणार डब्यांची रचना
प्रगती एक्सप्रेसला एक विस्टाडोम कोच, एक वातानुकूलित चेअर कार, ११ द्वितीय श्रेणी चेअर कार (५ आरक्षित ४ अनारक्षित, मासिक तिकीट धारकांसाठी आणि महिला तिकीट धारकासाठी ५४-५४ आसनं राखीव असतील) गार्डच्या ब्रेक व्हॅनसह एक सामान्य द्वितीय श्रेणी कोच असणार आहे. प्रगती एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा आणि शिवाजी नगर येथे थांबा असणार आहे.