सामन्यानंतर अमेरिकेचा क्रिकेटपटू हॉटेलमधून करतो वर्क फ्रॉम होम

सौरभ नेत्रवलकरच्या बहिणीने दिली माहिती

सामन्यानंतर अमेरिकेचा क्रिकेटपटू हॉटेलमधून करतो वर्क फ्रॉम होम

अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज सौरभ नेत्रवलकर सध्या सुरू असलेल्या टी २० विश्वचषक २०२४ दरम्यान भारत आणि पाकिस्तान विरुद्धच्या चमकदार गोलंदाजीच्या कामगिरीमुळे खूप लोकप्रिय झाला आहे. भारतीय वंशाचा क्रिकेटपटू असणारा सौरभ पाकिस्तानविरुद्धच्या चांगल्या प्रदर्शनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. भारताविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची विकेट घेतल्याने चाहते आणि समीक्षक यांचीही त्याने वाहवा मिळवली.

सौरभ सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी ओरॅकलसोबत काम करत आहे. त्याची बहीण निधीने सौरभ हा क्रिकेट आणि कामाचा समतोल कसा साधतो, याबाबत एका मुलाखतीत माहिती दिली आहे. निधीने सांगितले की, त्याला त्याच्या कामाप्रति खूप निष्ठा आहे. सामन्यांनंतर तो हॉटेलमध्येच बसून कामही करतो. तो खूप भाग्यवान आहे की, त्याला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच साथ देणारे सहकारी लाभले. जेव्हा तो क्रिकेट खेळत नसतो तेव्हा त्याला नोकरीसाठी १०० टक्के द्यावे लागतात हे त्याला माहीत आहे. त्यामुळे सध्या, तो काम करत असताना, तो त्याचा लॅपटॉप सर्वत्र घेऊन जातो. आणि त्याला कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे,’ असे निधीने न्यूज १८ला सांगितले.

‘तो भारतात येतो तेव्हाही तो त्याचा लॅपटॉप घेऊन येतो. तो काम करत असतो. त्यामुळे हॉटेलमध्ये सामना संपल्यानंतर तो त्याचे काम करतो. तो त्याचे काम खूप समर्पित भावनेने करत असतो,’ असे निधी म्हणाली. काम आणि क्रिकेटमध्ये उत्तम समतोल साधल्याबद्दल सौरभचे खूप कौतुक होत आहे. सौरभ सध्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी ओरॅकलमधून रजेवर आहे. निधीने त्याचे खेळाप्रती असलेले समर्पणही स्पष्ट केले. मुंबईत वाढल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानून पटापट काम करण्याची जी मुंबईची संस्कृती आहे, ती त्याने छानपणे जोपासली आहे. या सर्वांतून आपल्याला त्याच्यातला मुंबईकरपणाच दिसतो,’ असेही ती म्हणाली.

हे ही वाचा..

अमेरिकेची टी २० विश्वचषकाच्या सुपर आठमध्ये धडक; पाकिस्तान आऊट

सराफा व्यापाऱ्याकडून शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या विरोधात फसवणूकीची तक्रार

अंतरवालीत जरांगेंनंतर ओबीसी आक्रमक, उपोषण सुरु!

“ठाकरेंनी चार महिने ज्यांचे पाय पकडले त्यांच्यामुळेच माविआला मतदान”

‘जेव्हा तो सुरुवातीला क्रिकेट प्रशिक्षणासाठी ट्रेनने चर्चगेटला जायचा तेव्हा तो त्याचा गृहपाठ करत असे. तो क्रिकेट खेळला पण त्याने चांगला अभ्यासही केला. तो त्याच्या वर्गात अव्वल येत असे,’ असे त्याच्या बहिणीने सांगितले.

Exit mobile version