अरबी समुद्रात शनिवार, २३ डिसेंबर रोजी एमवी केम प्लूटो या एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यात जीवितहानी झालेली नसली तरी जहाजाला आग लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर भारताने खबरदारीचा उपाय म्हणून अरबी समुद्रात युद्धनौकांची तैनाती वाढवली आहे.
एमवी केम प्लूटोवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर भारतीय नौदलाने खबरदारीचा उपाय म्हणून अरबी समुद्रात तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. आयएनएस मोर्मुगाओ, आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या तीन युद्धनौका आता अरबी समुद्रावर करडी नजर ठेवणार आहेत. याशिवाय सर्वदूर नजर ठेवण्यासाठी म्हणून टेहळणी विमान ‘पी 8 आय’ला तैनात केलं आहे.
हे ही वाचा:
सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य हिंदू धर्माविषयी ओकली गरळ
मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!
खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!
शनिवारी पोरबंदरपासून जवळपास २१७ समुद्री मैल अंतरावर एमवी केम प्लूटो जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या जहाजात सुमारे २० भारतीय सदस्य होते. या घटनेनंतर भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने लगेचच या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांच्या मदतीसाठी युद्धनौका तैनात केल्या आहेत. सध्या एमवी केम प्लूटो जहाज मुंबई बंदरात पोहोचले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर या जहाजावर ड्रोन हल्ला झाला. हा हल्ला झाला, त्यावेळी किती प्रमाणात स्फोटकांचा वापर झाला याची माहिती लवकरच फॉरेन्सिक आणि टेक्निकल तपासातून समोर येणार आहे. एमवी केम प्लूटो जहाजावरील ड्रोन हल्ल्यामागे इराण असल्याचं अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटलं आहे.