काँग्रेसच्या पराभवानंतर आता समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश सिंह ‘इंडिया’आघाडीत स्वतःचा वरचष्मा निर्माण करू शकतात. जेव्हा उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत जागावाटप होईल, तेव्हा काँग्रेसच्या वाईट कामगिरीची दखल घेतली जाईल.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये पराभूत झाल्यामुळे काँग्रेसचे इंडिया आघाडीतील वजन कमी होणार आहे. याची सुरुवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यांनी या पराभवाला काँग्रेसचा अहंकार कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी काँग्रेसला लक्ष्य करून काँग्रेसने अखिलेश सिंह यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. आता अखिलेश उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच्या जागावाटपादरम्यान त्याचा वचपा काढतील, असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
अधिवेशनात पराभवाचा राग काढू नका
भोपाळमधील इंडिया आघाडीची रॅली स्थगित
इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भोपाळमध्ये रॅली काढावी, असे बैठकीत ठरले होते. मात्र काँग्रेसनेते कमलनाथ यांनी यावर आक्षेप घेऊन ती रॅली रद्द केली होती. त्यांनी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीनंतरच अशा प्रकारची रॅली होईल, असे जाहीर केले होते. त्यामुळेही इंडिया आघाडीच्या घटकपक्षांमध्ये दुरावा वाढला. मध्य प्रदेशमध्ये आप, बसप आणि समाजवादी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या.
काँग्रेसला उत्तर प्रदेशात अवघ्या १२ जागा?
अखिलेश सिंह लवकरच इंडिया आघाडीच्या अंतर्गत जागावाटपाबाबत चर्चा करतील. समाजवादी पक्ष काँग्रेसला केवळ १० ते १२ जागा सोडेल, असे मानले जात आहे. मात्र काँग्रेसला किमान ३० जागा हव्या आहेत.