एमसीएच्या अध्यक्षपदासाठी २३ जुलैला पोटनिवडणूक होणार आहे. अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ४ ते १० जुलै कालावधी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
१० जून रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले होते. टी-२० वर्ल्डकप २०२४ चा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी अमोल काळे अमेरिकेला गेले होते. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते.
अमोल काळेंच्या निधनाने क्रिकेट, राजकारण आणि प्रशासकीय वर्तुळाला जबर धक्का बसला होता. दरम्यान, अमोल काळे यांच्या निधनानंतर एमसीएचे अध्यक्ष पद रिकामे आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २३ जुलैला पोटनिवडणूक होणार आहे. ४ ते १० जुलै कालावधी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २३ जुलैला मतदान होईल आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या राजेश अग्रवालांची प्रचारात आघाडी
‘नव्या संकल्पासह काम करेल १८ वी लोकसभा’
भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!
दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये अमोल काळे यांची एमसीएच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षपदासाठी त्यांच्याविरुद्ध विश्वचषक चॅम्पियन संदीप पाटील यांच्यात लढत झाली होती. मात्र, यामध्ये अमोल काळेंची निवड करण्यात आली.एमसीएचे अध्यक्ष बनल्यानंतर अमोल काळेंनी खेळांडूसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुंबईच्या वरिष्ठ पुरुषांची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय आहे.आगामी मोसमापासून मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय लागू करण्यात येणार आहे.