34 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषअपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना!

अपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना!

रविवार, ४ जून रोजी रात्री उशिरा मार्गावरची वाहतूक पूर्ववत

Google News Follow

Related

शुक्रवार, २ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २८८ प्रवाशांचा बळी गेला असून ९०० हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त भागात अनेक तास बचावकार्य सुरू होते. अखेर रविवार, ४ जून रोजी रात्री उशिरा या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती समोर आली आहे.

ओडिशामधील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांच्यात झालेल्या अपघातामुळे मोठी दुर्घटना घडली होती. या भीषण अपघातानंतर तब्बल ५१ तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वे अधिकारीही उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडी रवाना झाली.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत यासंबधी माहिती दिली आहे. अपघातग्रस्त डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. या भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. तसेच, अप- लाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तब्बल दोन दिवसांनी अपघातग्रस्त भागातून ट्रेन रवाना झाली. यावेळी ट्रेनकडे पाहून रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले आणि प्रार्थनाही केली. यावेळी रेल्वेमंत्री भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ट्रेन रवाना होताच रेल्वेमंत्री यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या तसेच त्यांनी लोकांचे आभारही मानले.

हे ही वाचा:

सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत

बालासोर रेल्वे दुर्घटनास्थळी मदतीसाठी एकवटले शेकडो हिंदू कार्यकर्ते !

आपल्या मुलीला ‘हिरोईन’ बनवण्यासाठी आई तिला देत असे ‘हार्मोन्सच्या गोळ्या’ !

राजीनामा मागणाऱ्यांना रेल्वेमंत्र्यांनी सुनावले; ही मदत करण्याची वेळ राजकारणाची नव्हे!

कसा झाला अपघात?

कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाईनमध्ये गेल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. पुढे कोरोमंडल एक्स्प्रेसवर बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी हा एक अपघात असल्याचं बोललं जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा