आशियाई देशातील भिकाऱ्यात ९० टक्के पाकिस्तानी!

दहशतवादी, गाढव आणि आता भिकारी निर्यात करणारा पाकिस्तान

आशियाई देशातील भिकाऱ्यात ९० टक्के पाकिस्तानी!

पश्चिम आशियाई देशांमध्ये ताब्यात घेतलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के हे पाकिस्तानचे असून हे भिकारी इराक आणि सौदी अरेबियाच्या तुरुंगात बंद आहेत, असे परदेशी पाकिस्तानी सचिवांनी नुकतेच एका स्थायी समितीला सांगितले.मक्काच्या ग्रँड मशिदीमधून अटक करण्यात आलेले बहुतांश पाकीट चोर हे पाकिस्तानी.

पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करण्यासाठी ओळखला जातो आणि भारत त्याचा बळी ठरला आहे. पाकिस्तानने चीनला गाढवांची निर्यातही केली होती. पाकिस्तानच्या निर्यातीच्या असामान्य यादीत भर पडली आहे ती म्हणजे भिकाऱ्यांची.पश्चिम आशियाई देशांमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने
सौदी अरेबिया आणि इराक यांसारख्या देशांनी पाकिस्तान सरकारला भिकाऱ्यांचा प्रवाह रोखण्याची विनंती केली आहे.तसेच मक्काच्या ग्रँड मशिदीतून अटक करण्यात आलेले पाकीट चोर बहुतांश पाकिस्तानी आहेत.

वाढती महागाई, गगनाला भिडणारे अन्न आणि इंधनाचे दर यांचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील गरीब जनतेला होत आहे.यामुळे पाकिस्तानमधील भिकारी मोठ्या संख्येने पश्चिम आशियाई देशांमध्ये जात आहे. पाकिस्तानींच्या परदेशी स्थायी समितीने ही बाब उघडकीस आणून चिंता व्यक्त केली.

हे ही वाचा

रेल्वे कर्मचारी ‘घुसले’ मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

पश्चिम आशियाई राष्ट्रांमध्ये ताब्यात घेतलेल्या सर्व भिकाऱ्यांपैकी ९० टक्के पाकिस्तानचे आहेत आणि हे भिकारी इराक आणि सौदी अरेबियाच्या तुरुंगात बंद असल्याचे, ओव्हरसीज पाकिस्तानीजचे सचिव झीशान खानजादा यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या जिओ न्यूज उर्दूच्या बातमीनुसार, “इराक आणि सौदी अरेबियाच्या राजदूतांनी आम्हाला सांगितले आहे की, पाकिस्तानी भिकारी उमराह झियारत (तीर्थयात्रेच्या) नावाखाली व्हिसाकाढून येतात आणि परदेशात प्रवास करतात, त्यानंतर रस्त्यावर भीक मागायला सुरुवात करतात.द न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार , मक्काच्या ग्रँड मशिदीमधून अटक करण्यात आलेले बहुतांश पाकीट चोर हे पाकिस्तानी नागरिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिनेटर मंजूर काकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जीशान खानजादा यांनी स्थायी समितीला माहिती दिली की, परदेशात जवळपास १० दशलक्ष पाकिस्तानी नागरिक राहतात, यामध्ये भीक मागणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.अशा व्यक्ती प्रथमतः व्हिसा मिळवतात आणि नंतर इतर देशामध्ये जाऊन भीक मागण्याच काम करतात.पाकिस्तानमधून मध्यपूर्वेला जाणारी उड्डाणे अनेकदा भिकाऱ्यांनी भरलेली असतात, ते पुढे म्हणाले.

यूएईमध्ये १६ लाख पाकिस्तानी आणि कतारमध्ये २ लाख पाकिस्तानी उपस्थित असल्याची माहिती समितीला देण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानच्या द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिली आहे.याशिवाय, इराकी आणि सौदी अरेबियाच्या मुत्सद्दींनी दावा केला आहे की, त्यांच्या तुरुंगांमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांनी गर्दी केली आहे. ही बाब जागतिक स्तरावर पाकिस्तानला लाज आणणारी आहे, ते पुढे म्हणाले.

 

 

 

 

 

Exit mobile version