भारतात चविष्ट जेवण खाणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत.त्यानुसार भारतात अनेक प्रकारचे मसाले देखील बाजारात उपलब्ध आहेत.भारतात जास्त विक्री होणाऱ्या मसाल्यांमध्ये एमडीएच आणि एवरेस्ट कंपनीच्या मसाल्यांचा समावेश आहे.मात्र, या कंपनीच्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड आणि एवरेस्ट फूड प्रोडक्ट लिमिटेडच्या ‘करी मसाल्यां’च्या विक्रीवर हाँगकाँग व सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
हाँगकाँगने या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनात कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्याचे म्हटले आहे. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असेही अहवालात म्हटले आहे. त्यानंतर सिंगापूरनेही या दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे.
हाँगकाँगच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटने एक स्टेटमेंट जारी करत म्हटले की, एमडीएच ग्रुपच्या तीन मसाल्यांमध्ये, ज्यामध्ये मद्रास करी पावडर, सांभर मसाला पावडर आणि करी पावडर यांचा समावेश आहे.या तिन्ही मसाल्यांमध्ये कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साइडची मात्रा जास्त आढळली गेली आहे.
हे ही वाचा:
भाजपाने निकलापूर्वीच लोकसभेचे खाते उघडले! सुरतमध्ये मुकेश दलाल बिनविरोध विजयी
घराणेशाहीच्या कारखान्याला लोकांनी कुलूप लावले; राहुल, अखिलेश शोधत आहेत चाव्या!
इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा
‘मठ, मंदिरांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर’
सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एव्हरेस्टच्या फिश तरी मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात एथिलीन ऑक्साइडची मात्रा आढळून आला आहे. अॅथिलीन ऑक्साइड एक किटकनाशक आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी एव्हरेस्टच्या फिश तरी मसाला बाजारातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.सिंगापूरसह ८० देशांमध्ये एव्हरेस्टच्या प्रोडक्टचा पुरवठा केला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने देशातील सर्व फूड कमिश्नरना अलर्ट केले आहे. दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांचे सँम्पल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे मसाला बनवण्याच्या सर्व कंपन्यांच्या प्रोडक्शन युनिटमधून सॅम्पल घेण्यात येणार आहे.या सॅम्पलचे २० दिवसांत लॅबमधून अहवाल येणार आहेत.