26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषदिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग, ७ बालकांचा मृत्यू!

दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग, ७ बालकांचा मृत्यू!

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

Google News Follow

Related

दिल्लीतील विवेक विहारच्या बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी (२५ मे) रात्री उशिरा लागलेल्या आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, या भीषण अपघातात १२ मुलांना वाचवण्यात यश आले, त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. पाच मुले रुग्णालयात दाखल असून एक व्हेंटिलेटरवर आहे. या घटनेनंतर मुलांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

मुलांना वाचवणाऱ्या अंकित बसंतने सांगितले की, खूप आग लागली होती. १०० मीटरच्या पुढे कोणीही जाऊ शकत नव्हते. मागच्या बाजूच्या गेटमधून नर्स बाहेर येत होत्या. नर्सने आम्हाला सांगितले की, आतमध्ये ११ मुले आहेत.त्यानंतर आम्ही मुलांना बाहेर काढून रुग्णवाहिकेमध्ये बसवले.मुलांना रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. पहिली ३-४ मुलं बरी होती, पण नंतरची मुलं धुरामुळे काळी झाली होती.या काळात खूप समस्या निर्माण झाल्या.सिलेंडर फुटल्याचा बाहेर आवाज आल्याचे त्याने सांगितले.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाचा आरोप करत जमावाचा ख्रिश्चनांवर हल्ला!

चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी जाहीर!

राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!

दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:३२ वाजता त्यांना आग लागल्याची माहिती मिळाली.अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. बचाव पथकाचे प्रमुख अतुल गर्ग यांच्या मते, बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.दिल्ली अग्निशमन दलाने १२ नवजात बालकांना बाहेर काढले.या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर एक बालक व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे.दरम्यान, या दुर्घटनेत मृत बालकांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा