नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर

नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय झाले आहेत. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात आली आहेत.

नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून ‘मायलन इंडीया’ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत. लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.

नितीन गडकरी यांनी यापूर्वी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे. उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स

रेमडेसिवीर!! भाजपाने ‘आणून दाखवले’!!

लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही- भाजपा

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

नागपूरमधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत २ लाख ८४ हजार २५८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २ लाख २१ हजार ३८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५८ हजार ५०७ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ४ हजार ३१८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

Exit mobile version