नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू

मृतांमध्ये बालकांचाही समावेश

नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू

नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे शासकीय रुग्णालयांचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या ४८ तासांमध्ये तब्बल ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातील घटना उघडकीस आल्याने सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.

घाटी रुग्णालयात मागच्या २४ तासात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, अशी माहिती आहे.

घाटी रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक मोठ आणि महत्त्वाचे रुग्णालय आहे. १२ ते १४ जिल्हे या रुग्णालयावर अवलंबून आहेत. दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्या तुलनेत रुग्णालयाला पुरेसा निधी मिळत नसून घाटी रुग्णालयामध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. या औषध तुटवड्याचा परिणाम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर होत असतो.

हे ही वाचा:

कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई

चिनी फंडींग प्रकरणी ‘न्यूज क्लिक’मधील पत्रकारांच्या घरांवर छापेमारी

घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…

ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!

घाटी रुग्णालयामध्ये एकूण १ हजार १७७ खाटा आहेत. तरी या खाटांमध्ये प्रत्यक्ष भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ५०० ते १ हजार ७०० असते. सध्या घाटी रुग्णालयामध्ये पुढील १५ दिवस पुढील एवढाच औषध साठा असल्याचं समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Exit mobile version