मराठा, ओबीसी आणि धनगर समाजानंतर आता ब्राम्हण समाजाचेही उपोषण!

विविध मागण्यांसह जालन्यात ब्राम्हण समाज आक्रमक

मराठा, ओबीसी आणि धनगर समाजानंतर आता ब्राम्हण समाजाचेही उपोषण!

मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटला नाही.त्यात ओबीसी आणि धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी पेटून उठला आहे.त्यात अजून भर पडली आहे ती म्हणजे ब्राह्मण समाजाची.समस्त ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जालन्यात आमरण उपोषण करण्यात आले आहे.परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना, अशा मागण्या ब्राह्मण संघर्ष समितीच्या आहेत.

 

परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना अशा विविध मागण्यासाठी जालन्यात समस्त ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले आहे.

जालना शहरातील महात्मा गांधी चौकात ब्राह्मण समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी दीपक रणवरे हे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील १५ वर्षांपासून ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन सरकारकडे मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र, सरकारने याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने जालन्यात गांधी चमन परिसरात ब्राम्हण समाजाचे दीपक रणवरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

हे ही वाचा:

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला

अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदलीमुळे रुग्णांचे हाल

शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?

स्टॅलिन, अखिलेश यांच्या उपस्थितीत व्ही.पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे आश्चर्य

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या
ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.
ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.
ब्राह्मण समाजातील विद्याथ्र्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे / स्थापन करण्यात यावे.
ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५ हजार रुपये मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.
ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-२ मधुन वर्ग-१ वर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.
ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी.
परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करून मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील.
ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची-आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी.

 

Exit mobile version