मध्य प्रदेशनंतर ‘या’ राज्यात ‘द केरळ स्टोरी’ करमुक्त!

इतरही राज्यांमधून ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी

मध्य प्रदेशनंतर ‘या’ राज्यात ‘द केरळ स्टोरी’ करमुक्त!

दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या गर्तेत अडकला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यावर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला. त्यानंतर इतरही राज्यांमधून हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनेही राज्यात हा सिनेमा करमुक्त केला जाईल, अशी घोषणा केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा करमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिली आहे. मुख्यमंत्री योगी हे स्वतः त्यांच्या मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा पाहणार असल्याची चर्चा आहे.

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवार, ६ मे रोजी चित्रपटाला करमुक्त जाहीर केले. तसेच सिनेमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “हा चित्रपट लव्ह जिहाद, धर्मांतराच्या दहशतवादाचा कट उघड करतो. हा चित्रपट प्रबोधन करतो त्यामुळे मुलांनी आणि पालकांनी हा चित्रपट जरूर पाहावा.”

हे ही वाचा:

केदार शिंदेंना ‘केरळ स्टोरी’ची पोटदुखी का?

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार

सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी

‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हा चित्रपट केरळमधील धार्मिक प्रवृत्ती आणि कट्टरपंथी इस्लामिक धर्मगुरूंकडून हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना कशा प्रकारे लक्ष्य केले जात आहे यावर आधारित आहे.

Exit mobile version