टळटळीत उन्हामुळे दुपारी १२ ते ५ पर्यंत कार्यक्रम घेऊ नका!

उष्माघात दुर्घटनेनंतर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

टळटळीत उन्हामुळे दुपारी १२ ते ५ पर्यंत कार्यक्रम घेऊ नका!

नवी मुबईतील खारघरमध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक श्री सेवक रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

खारघरमध्ये एका भव्य खुल्या मैदानांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो श्रीसेवकांनी उपस्थित लावली होती. यातील बरेच श्रीसेवक तीन दिवस आधीपासून येऊ लागले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले होते. पण श्रीसेवकांनी आदल्या दिवसापासूनच कार्यक्रमासाठी एकच गर्दी केली होती. पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी दुपारचे तापमान खूप वाढले होते. त्यामुळे कार्यक्रमाला आलेल्या श्रीसदस्यांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास होऊ लागला. कार्यक्रम झाल्यानंतर अनेक श्री सेवकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उष्माघातयामुळे उपचारांदरम्यान १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. विरोधकांनी या तापलेल्या वातावरणामध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेत या मृत्यूप्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्या येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील हा सोहळा संध्याकाळी घेण्यात यायला हवा होता, असे मत व्यक्त केलं होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने राज्यात दुपारी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये असा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री मगलप्रभात लोढा यांनी माध्यमांना दिली. मंगलप्रभात लोढा म्हणाले, भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.  जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

महाराष्ट्राला हे भूषण नाही!

तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर

खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्या दिवशी जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतलाय. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्व लोकांनी याचं पालन करायला पाहिजे असे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version