लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाकडून देणगी मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहिमेचा एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर केवळ ५.३५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचार सुरु केल्यानंतर कॉंग्रेसने एवढी देणगी मिळवली आहे. कॉंग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी एका पोस्टच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे.
हेही वाचा..
राममंदिर उद्घाटन; आजीच्या घरून तीन हजार क्विंटल तांदूळ तर सासरच्या घरून ११०० ताट भेटवस्तू!
इस्रायली जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर हिंदी महासागरात तीन युद्धनौका करडी नजर ठेवणार
सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य हिंदू धर्माविषयी ओकली गरळ
मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!
देणगी देणाऱ्यामध्ये महाराष्ट्र एक नंबरवर आहे तर छत्तीसगड मधून सर्वात कमी देणगी मिळाली आहे. महाराष्ट्रातून ८२.४८ लाख रुपये तर छत्तीसगडमधून १८.८७ लाख रुपये देणगी मिळाली आहे. दिल्लीमधून ३८.९३ लाख रुपये देणगी मिळाली आहे. राजस्थानमधून ५७.७३ लाख रुपये, उत्तर प्रदेशमधून ४७.०७ लाख हरियाणामधून ४६.८४ लाख रुपये आणि कर्नाटकमधून रुपये ३१.५६ लाख रुपये मिळाले. तेलंगणाने २७.८२ लाख, मध्य प्रदेशने रु. २७.०९ लाख आणि तामिळनाडूने रु. २४.०६ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.