ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीनंतर आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडू’

जम्मू-काश्मीरमधील ९० विधानसभा जागांवर तीन टप्यात होणार मतदान

ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीनंतर आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडू’

भारत निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका जाहीर केल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या निर्णयात कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात पक्ष ठराव मंजूर करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ९० विधानसभा जागांवर मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या ठिकाणी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ जागांवर, दुसऱ्या टप्प्यात २६ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे. तर मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.

हे ही वाचा :

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणः सोशल मीडियावरून पीडितेचे नाव, फोटो, ओळख हटवण्याची मागणी !

कोलकत्ता बलात्कार चौकशीबद्दल तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद

मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८३ लाखांचे कोकेन जप्त !

धक्कादायक ! कार चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, दोघांचा मृत्यू !

 

या निवडणुकांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या निर्णयात कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात पक्ष ठराव मंजूर करेल. ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर आमचा पक्ष जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पहिले काम म्हणून या प्रदेशातून राज्याचा दर्जा आणि विशेष दर्जा काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव पास करेल.

तसेच ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत निवडणुकीत भाग घेणार नसल्याचे सांगितले होते. ओमर अब्दुल्ला यांचे वडील आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) प्रमुख फारुख अब्दुल्ला हे आगामी निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.

Exit mobile version