उत्तरप्रदेशच्या झांसीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर सुतारकाम करत असणाऱ्या पतीला सोडून पत्नी पळून गेली आहे. विशेष म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह होता. पत्नी लेखापाल झाल्यानंतर तिने आपल्या पतीला ओळख देणे सुद्धा बंद केले आहे. केवळ पती हा सुतारकाम करत असल्यामुळे तिने असा प्रकार केला, असे त्या पतीचे मत आहे.
झांसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लेखापाल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जात होती. त्यावेळी एक पती आपल्या पत्नीची वाट बघत बाहेर उभा होता. कारण त्याची पत्नी लेखापाल झाली होती. तो आपल्या पत्नीच्या हाती ति लेखापाल झाल्याचे पत्र पाहण्यासाठी उत्सुक होता. मात्र बाहेर पती उभा आहे, हे पाहून पत्नी तिथून कधी बाहेर पडली हे त्या पतीला कळलेच नाही.
हेही वाचा..
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
‘रामसेतू’ मार्गाचे रहस्य उलगडणार, इस्रोने तयार केला समुद्राखालील नकाशा !
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयचा नकार
त्यानंतर तो आपल्या पत्नीच्या शोधासाठी सासरी गेला. तिथेही ती नव्हती. त्यामुळे पतीने आपली पत्नी गायब झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी पत्नीला काही वेळातच शोधून काढले. मात्र जेव्हा तिने पोलिसांना काही गोष्टी सांगितल्या तेव्हा पतीच्या पायाखालची वाळू घसरली. ति म्हणाली आता मी लेखापाल झाली आहे आणि पती हा सुतारकाम करतो, हे कुठेतरी मेळ खात नाही.
पतीने सांगितले की पाच वर्षापूर्वीपासून आमची ओळख आहे. प्रेमसंबंध निर्माण झाल्याने आम्ही विवाह केला. तिला अधिकारी बनण्याची इच्छा होती, त्यामुळे पतीने पत्नीला शिकवण्याचे ठरवले. सुतारकाम करून त्याने पत्नीच्या शिक्षणासाठी पैसे दिले. मात्र आज ति लेखापाल झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. जर तिला नियुक्ती पत्र मिळाले नसते तर तिने असा पळून जाण्याचा निर्णय घेतला नसता, असे पतीने शेवटी सांगितले.